﻿स्तोत्र.
134.
परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या, जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या. 
पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा; आणि परमेश्वरास धन्यवाद द्या. 
आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो. 
